1.

दुःखे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्यावेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावून सुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही, हे आपणाला माहित नाही काय ? पैलू पाडल्याशिवाय हि‌र्याे‍लासुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी दुःखे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पडण्यासाठी निर्माण झाली आहे असे आपण का समजू नये? शिवाय असे पहा, जगात दुःखे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्व. त्याचप्रमाणे दुःख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्व आहे असे तुम्हाला वाटत नाही? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हाला माहित आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही निराळीच असते असा अनुभव कुणाला नाही? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळाच्या दुःखाबद्दल आपण कुरकूर का करावी? आणि दुःख पर्वताएवढे का मानावे? -- परीक्षेच्या निकालाच्या आनंदाची खरी गोडी कधी कळते?

A. परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच
B. पुस्तकांचे वाचन करून परीक्षा दिल्यानंतर
C. घरी अभ्यास करून परीक्षा दिल्यानंतर
D. अभ्यास न करताच परीक्षा दिल्याने
Answer» B. पुस्तकांचे वाचन करून परीक्षा दिल्यानंतर


Discussion

No Comment Found

Related MCQs